पुरोगामी शिक्षक संघटना लावणार ५० हजार झाडे

पुरोगामी शिक्षक संघटना लावणार ५० हजार झाडे

89112

पुरोगामी शिक्षक संघटना लावणार ५० हजार झाडे

कणकवलीतील बैठकीत निर्धार : पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ : पर्यावरण रक्षणासाठी पावसाळ्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना राज्यभरात सुमारे ५० हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करणार आहे. कणकवली येथे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्धार करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक कणकवली येथे राज्य नेते विजय भोगेकर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. बैठकीत निसर्गातील वाढते तापमान व होत असलेली वृक्षतोड यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावर चर्चा होऊन राज्यभर हा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे. तसेच बैठकीत शिक्षकांची रिक्त पदे शंभर टक्के भरावीत, संच मान्यतेचे अन्यायकारक निकष रद्द करावेत, बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार, कायद्यानुसार पाचवी व आठवीचे वर्ग विनाअट जिल्हा परिषद शाळेस जोडावेत, सहावी ते सातवी अथवा सहावी ते आठवीच्या वर्गांना विनाअट तीन शिक्षक मंजूर करावेत, आंतरजिल्हा ७ वा टप्पा सुरू करावा, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ मुक्त करावे, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना शिपाई पद मंजूर करावे, सर्व केंद्र शाळांना लिपिक पद मंजूर करावे, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, जून व डिसेंबरमध्ये वर्षातून दोन वेळा पदोन्नती घेण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत, नवीन भरतीतील उमेदवारांना नियुक्तीचे निर्देश व्हावेत, आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. बैठकीस राज्य नेते भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, प्रकाश पाटील, रंगराव वाडकर, प्रेमिला माने, सुरेश साळवी, गोविंद पाटील, जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, एस. के. पाटील, किशोर आनंदवार, इरफान मिर्झा, महेंद्र हिवे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यशवंत पेंढारकर, संघर्ष सावरकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर, देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव, प्रदीप पवार, तुषार पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, नितीन पेढेकर, जीवन भोयर, गजानन चिंचोळकर, सुभाष अडवे, किरण राठोड, बालाजी हाळदे, देवराव अमोदे, गोकुळ चारथळ, लक्ष्मण खोब्रागडे, किशोर यनगंटीवार, लक्ष्मण सुरपाम, जगदीश ठाकरे, बाबा रणसिंग, नाथ मोरे, मनोज पवार, आदी उपस्थित होते. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश वाडकर यांनी स्वागत केले. हरीश ससनकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com