कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य

कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य

कुवारबाव हद्दीमध्ये कचऱ्याचे ढीग

बेशिस्तांवर कारवाईची मागणी; कार्यवाहीकडे स्थानिकांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. बेशिस्त आणि बेफिकीर ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे कुवारबाव येथील पत्रकार कॉलनीतील नाल्याजवळ प्रदूषीत कचरा खाऊन विषबाधा झाल्यामुळे गाईचा मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायतीने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन साफसफाई करावी आणि बेशिस्त कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
पावसाळा सुरू झाला आहे. ग्रामपंचायतीने पावसापूर्वीच तयारी म्हणून गावात नालेसफाई करण्याची गरज आहे. तसेच कचरा कुंड्या साफ ठेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने एक गंभीर बाब पुढे आली आहे. कुवारबाव येथील पत्रकार कॉलनीच्या समोर नाल्यामध्ये ग्रामस्थ उघड्यावर बेशिस्त कचरा टाकत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे. कुवारबाव परिसरातील बेफिकीर रहिवासी उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे पत्रकार कॉलनी नाल्याजवळ प्रदूषित कचरा खाऊन विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. हा प्रदुषित कचरा खाऊन एका गाईचा नाहक मृत्यू झाला आहे. नाल्यातील प्रदूषित पाणी खालील भागात वाहून जात असल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचे साठे व विहिरी प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात रहिवाशांना साथीच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायतीने रहिवाशांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून गाव स्वच्छ ठेवण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com