पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे टाकेडे गाव

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे टाकेडे गाव

- rat10p6.jpg-
P24M89164
टाकेडे : पर्यावरण दिनाचे निमीत्ताने टाकडे येथे कार्यक्रमात वृक्षारोपण करताना अधिकारी, मान्यवर व टाकेडे ग्रामस्थ महिला.
- rat10p7.jpg-
24M89165
टाकेडे : २०१७ मध्ये आमदार योगेश कदम यांच्या हस्ते लावून वाढविण्यात आलेले फणसाचे झाड.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे टाकेडे गाव

पर्यावरण दिन साजरा ; अभिनव उपक्रमांतून प्रोत्साहन

सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. 10 ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंडणगड तालुक्यातील टाकेडे हे गाव गेली अठरा वर्षे वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामुळे टाकेडे गाव पर्यावरण संवर्धनाचे केंद्र बनले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी....ही उक्ती प्रत्यक्षात आणत संतुलित पर्यावरणाचे महत्व या गावाने सर्वांपुढे ठेवले आहे.

टाकेडे ग्रामविकास मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने टाकेडे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम झाला. या निमित्ताने गावातील विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमाला चंद्रकांत शिंदे यांनी भुषविले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गावच्या लोकसहभागातून वृक्ष देणगी स्वरूपात जमा करून त्याचे वितरण करण्यात येते. नैसर्गिक अमूल्य संपत्ती ग्रामस्थ महिला कर्तव्य व जबाबदारीने लागवड करून जतन करीत आहेत. त्यामुळे गावाचा आजुबाजुचा परिसर वनराईने नटलेला हिरवा गर्द दिसून येतो. दुर्मिळ वन्यजीवांचा दर्शनीय वावर हा टाकेडे परिसरातील निसर्गसंपदेची साक्ष देणारा ठरतो आहे. विविध प्रकारची झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन होईल याची काळजी ग्रामस्थांकडून घेतली जाते. या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झाड ज्याचे सशक्त आणि सदृढ वाढलेले असेल त्याचा विशेष सत्कार केला जातो. त्यातून गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात येते. कार्यक्रमात वनपाल दळवी, ग्रामसेवक पालवे, कृषी विभागाचे नागरगोजे, अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे यांनी कृषी वनविभाग व जिल्हा परिषद विविध योजनांची माहीती देत वृक्षलागवडी कशी करावी, माती परिक्षणाची आवश्यकता या विषयावर ग्रामस्थांना माहीती दिली. या कार्यक्रमाला माजी सभापती अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे, अनंत केंद्रे, दयानंद येसरे, वनपाल अनिल दळवी, पोलीस पाटील दिनेश जाधव, अंगणवाडी सेविका अमिता गणवे, ग्रामीणचे अध्यक्ष सिताराम सुर्वे, उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्षा प्रियांका साळुंखे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व टाकेडे ग्रामस्थ उपस्थित होते.

----
कोट
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर टाकेडे ग्रामस्थ खारीचा वाटा उचलून गावाच्या हद्दीत पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत आहेत. कोकणात वाढणारी सर्व प्रकारची झाडे लावून गावातील सार्वजनिक परिसर, देवराई, रस्ते, स्मशानभूमी नैसर्गिकपणे सुशोभित करण्याचा संकल्प आहे.

- अनंतराव शिंदे, निवृत्त शिक्षक व ग्रामस्थ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com