ज्येष्ठांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी

ज्येष्ठांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी

rat१०p८.jpg-
२४M८९१६६
रत्नागिरी : श्रीराम मंदिर कट्टा आयोजित कार्यक्रमात बोलताना नेत्रतज्ज्ञ डॉ. अश्विन वैद्य. सोबत डॉ. दिलीप पाखरे, अण्णा लिमये, कुमार शेट्ये, अॅड. मिलिंद पिलणकर, उर्मिला घोसाळकर आदी.

ज्येष्ठांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी

डॉ. अश्विन वैद्य ः श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : दृष्टी चांगली असेल तर जीवन समाधानाने जगता येते. त्यामुळे ज्येष्ठांनी वेळोवेळी आपल्या दृष्टीची तपासणी करून घ्यावी, डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ, डॉ. आश्विन वैद्य यांनी केले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा मासिक रौप्य महोत्सवी मेळाव्यात ज्येष्ठांनी डोळ्यांची घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाची रौप्य महोत्सवी सभा श्री राम मंदिरात झाली. ते म्हणाले, मधुमेह आणि रक्तदाब यामुळे डोळ्यांच्या विशिष्ट भागांना इजा पोहोचते. मोतीबिंदू आणि काचबिंदू होऊ नये यासाठी मधुमेह दूर ठेवावा, प्रेशर नेहमी नियंत्रणात ठेवावा, डोळ्यांचा प्रेशर वेळोवेळी डॉक्टरकडून तपासून घ्यावा, असे आवाहनही डॉक्टर वैद्य यांनी केले.
श्रीराम मंदिर संस्था आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या प्रमुख उर्मिला घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी श्रीराम मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मिलिंद पिलणकर, श्रीराम मंदिर कट्टाचे अध्यक्ष अण्णा लिमये, कुमार शेट्ये, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुधाकर सावंत यांनी श्रीराम मंदिरात ज्येष्ठांच्या चांगल्या आरोग्यासाठी श्रीरामाला साकडे घातले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे अध्यक्ष अण्णा लिमये यांचा सत्कार घोसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योग प्रशिक्षिका स्मिता साळवी, कुमार शेट्ये, डॉक्टर अश्विन वैद्य आणि मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. दिलीप पाखरे यांनी केले. ॲड. पिलणकर यांनी आभार मानले.
जून महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना या वेळी गुलाबपुष्प आणि शुभेच्छापत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संतोष रेडीज, कट्टाचे सचिव सुरेंद्र घुडे आणि रमाकांत पांचाळ यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com