अपूर्ण कामांमुळे महामार्ग चिखलमय

अपूर्ण कामांमुळे महामार्ग चिखलमय

-rat१०p१२.jpg-
२४M८९१८४
तुळशी: पुलावरील अपूर्ण कामांमुळे चिखलात वाहने आपटण्याच्या घटना घडत आहेत.
-rat१०p१३.jpg-
P२४M८९१८५
मार्गावरील चिखलात वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे.
----------------

महामार्गावरील साचलेल्या चिखलातून जीवघेणा प्रवास

म्हाप्रळ-आंबडवे अपूर्ण कामाचा फटका ; दुचाकी घसरून अपघात, दरड रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा ः
मंडणगड, ता. १० ः पाऊस सुरू झाला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील म्हाप्रळ-आंबडवे दरम्यानच्या अपूर्ण कामांमुळे रस्ता चिखलमय झाला आहे. प्रचंड चिखलात दुचाकी घसरून अपघात घडू लागले आहेत. तसेच महामार्गासाठी खोदलेल्या भागातून दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आले आहेत.
पावसामुळे आंबडवे, तुळशी, पाले, माहू, मंडणगड, शेनाळे, म्हाप्रळ दरम्यान रस्त्यावर मातीचा चिखल झाला आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. पावसापूर्वी एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. शेनाळे घाट ते शिरगाव याचबरोबर मंडणगड, तुळशी, पाले, पाचरळ, पाचरळे ते आंबडवे या गावांचे हद्दीत दोन लेनसाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र एक लेनही अद्याप पूर्ण झालेली नाही. रस्त्याला ठिकठिकाणी डिव्हाडर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे काही अंतर चांगला रस्ता तर काही अंतर खोदलेला रस्ता असा प्रवास करावा लागतो. पाऊस पडला की परिस्थिती आणखीन बिकट होते. यामुळे शहरापासून शेनाळे घाट व शहरापासून पालेपर्यंतचा रस्ता दुचाकी व लहान वाहनांसाठी अडचणीचा ठरत आहे. पूर्ण करण्यात आलेली एक लेने वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी पुढे येत आहे. महामार्गाला जोडून असलेल्या गावांचा जोडरस्ता अद्यापही पूर्ण जोडण्यात आला नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. रस्त्याला मोरीकडे पाणी वाहून नेणारे गटार बनविण्यात आले नसल्याने पाणी रस्त्यात साचून राहत आहे. तुळशी पुलावरील रस्ता तसाच ठेवल्याने वेगाने येणारी वाहने आपटली जात आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्वरीत उपाययोजना करा...

महामार्गावर साचलेल्या चिखलाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्वरित उपाययोजना करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष असून तहसीलदारांनी परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी तालुकावासीय करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com