अपेक्षा थोरबलेचे यश

अपेक्षा थोरबलेचे यश

अपेक्षा थोलबरेचे
‘मंथन’ परीक्षेत यश

राजापूर ः तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद शाळेत दुसरीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी अपेक्षा महादेव थोलबरे हिने मंथन राज्यस्तरीय परीक्षेत १५० पैकी १४४ गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. राज्याचे शिक्षण संचालक टेमकर आणि उपजिल्हाधिकारी अभिजित पठारे, अभिनेत्री अमृता धोंगडे, बालकलाकार हर्षद नायबळ आदींच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमात अपेक्षाचा सत्कार करण्यात आला. अपेक्षाने बीडीएस परीक्षेतही १०० पैकी ९८ व भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १०० पैकी ९६ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. यासाठी अपेक्षाने प्रचंड मेहनत घेतली होती. तिला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिर्के, श्रीमती चव्हाण, वर्गशिक्षिका श्रीमती पाष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशात तिची आई राणी थोलबरे व वडील महादेव थोलबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
--------

ज्येष्ठ नागरिक संघाचा
शनिवारी जनजागृती मेळावा

रत्नागिरी ः समाजातील बदलांमुळे ज्येष्ठांच्या कौटुंबिक समस्या वाढत आहेत. त्या दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिंबधक म्हणेजच ज्येष्ठ नागरिक अवहेलना प्रतिबंध जनजागृती दिवस साजरा करुन ज्येष्ठांच्या कल्याणकारी कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे १५ जूनला सायंकाळी चार वाजता कुवारबाव येथील जेष्ठ नागरिक भवनात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सुमारे २४ वर्षे सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेतू या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापीका अध्यक्ष श्रद्धा कळंबटे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांनाही या वेळी मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठांच्या छळ प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे व प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी केले आहे.
---------

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
पदविका प्रवेश सुरू

रत्नागिरी ः दहावी नंतरच्या तंत्रनिकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेकरिता येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र सुरू केले आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत ४८० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह स्थापत्य अभियांत्रिकी १२० जागा, संगणक अभियांत्रिकी प्रवेश क्षमता ६०, विद्युत अभियांत्रिकी प्रवेश क्षमता ६०, अणुविद्युत अभियांत्रिकी प्रवेश क्षमता ६०, यंत्र अभियांत्रिकी १२०, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रवेश क्षमता ६० या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. दहावी उत्तीर्ण जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी विहीत मुदतीत प्रवेश अर्ज निश्चिती करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. रा. रे. वाकोडकर यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज भरणे मुदत २५ जूनपर्यंत, कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती २५ जूनपर्यंत, तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जूनला, गुणवत्ता यादीवरील आक्षेप किंवा अर्ज दुरुस्ती २८ ते ३० जून, अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै असे वेळापत्रक आहे. निवड झालेल्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चिती आदी वेळापत्रक Poly२४.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी Poly२४.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहेत. याबाबत माहितीसाठी अ. आ. मुळये, नु. तौ. काझी, श्या. पां. ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com