मुसळधार पावसानंतरही टंचाई कायम

मुसळधार पावसानंतरही टंचाई कायम

मुसळधार पावसानंतरही टंचाई कायम

चिपळूण तालुका ; ५८ वाड्यांना टॅंकरने पाणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी अद्याप विहिरींतील पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे तालुक्यात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सध्याच्या स्थितीला तालुक्यात २ टँकरने २० गावातील ५२ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. नियमित पाऊस सुरू होईपर्यत टँकरने पाणी पुरवठा सुरू राहण्याची शक्यता आहे.
यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने तालुक्यातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. दसपटी विभागाला टंचाईचा मोठा फटका बसला. या विभागातील तिवरे धरण फुटीनंतर अद्याप त्याची उभारणी झालेली नाही. परिणामी वाशिष्ठी नदी कोरडी पडल्याने दसपटी विभागात पाणी टंचाई जाणवली. परिणामी दसपटीतील कादवड, कळकवणे या गावातील वाड्यांना टंचाईचा तडाखा बसला. सावर्डे येथील धरणाला गळती लागल्याने तेथील दुरुस्तीसाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला होता. परिणामी या परिसरातील सावर्डे, कुडप, डेरवण परिसरातील गावांना त्याचा फटका बसला. येथेही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय टेरव, करबंवणे, तिवडी,नारदखेरकी, कामथे आदी २० गावातील ५८ वाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतू सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांच्या विहीरी, खासगी विहीरी, बोअरवेल मधील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना जून महिना अर्ध्यावर आला तरी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
----------
गतवर्षीही उशिरापर्यंत टॅंकरने पाणी

गतवर्षी जूनमधील पाऊस लांबल्याने उशिरापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. टँकरचा अधिग्रहण कालावधी संपल्यानंतर टंचाई असतानाही दोन ते तीन दिवस टँकर बंद होते. मात्र टंचाईग्रस्त गावांचा आक्रोश वाढल्यानंतर पुन्हा बंद केलेले टॅकर सुरू करण्यात आले होते. यावर्षी अद्याप नियमीत दमदार पावसाला सुरवात झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com