त्या राज्यमंत्रीपदासाठी तटकरेंच्या नावाची शक्यता

त्या राज्यमंत्रीपदासाठी तटकरेंच्या नावाची शक्यता

सुनील तटकरेंना राज्यमंत्रीपद मिळेल

निकटवर्तींयांची अपेक्षा ; पहिल्या टप्प्यात मात्र निराशाच

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : लोकसभा निवडणुकीत कोकणातून रायगड -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आले. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण तसे झालेले नाही. भविष्यात भाजपाकडून ठेवलेल्या राज्यमंत्री स्वतंत्र पदभाराच्या प्रस्तावासाठी खासदार तटकरे यांचे नाव विचारात घेतले जाऊ शकते अशी आशा निकटवर्तींयांमध्ये निर्माण झाली आहे.
खासदार तटकरे हे रायगडमधून दुसऱ्यांदा खासदार निवडून आले आहेत. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपात राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांमध्ये तटकरे यांचा समावेश होता. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीकडून तटकरे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा होती. त्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सज्ज झाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ समावेशासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले. राष्ट्रवादीकडून पटेल यांच्यासाठी कॅबिनेटमंत्री पद मागण्यात आले होते. त्यामुळे या वेळीही तटकरेंची संधी हुकली. राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी जागा ऑफर केली होती. मात्र प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे राष्ट्रवादीकडून कळविण्यात आल्याचे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले होते. मात्र यापूर्वी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदावर काम केलेल्या पटेल यांना राज्यमंत्री पद देऊ शकत नाही असे राष्ट्रवादीकडून कळवण्यात आले. भविष्यात केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी सुनील तटकरे यांचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता निकटवर्तीयांमध्ये व्यक्त केली जात आहे.

कोट
सुनील तटकरे हे देश पातळीवरचे नेते आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यापुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रफुल पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. तर तटकरे यांचाही वरिष्ठ पातळीवर विचार होईल. आमच्या पक्षाला कोणतही मंत्रीपद सद्यःस्थितीत मिळालेले नाही. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही.
- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com