दुचाकीची मोटारीला धडक, स्वार जखमी

दुचाकीची मोटारीला धडक, स्वार जखमी

दुचाकीची मोटारीला धडक

दाभोळ : दापोली-खेड मार्गांवर दापोली शहाराजवळ असलेल्या नवानगर येथे दुचाकी व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघाताची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरजोळी (चिपळूण) येथील सुशांत सुभाष शेट्ये हे त्यांच्या मोटारीने लाडघर येथे जात असताना ते आज दुपारी नवानगर येथे आले. त्यावेळी दापोलीकडून खेडच्या दिशेने दुचाकी घेऊन जाणारे चनल दामू साळुंखे (रा. खोंडा दापोली) यांनी मोटारीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक चनल साळुंखे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com