कुडाळातील विजप्रश्नी महावितरणला घेराव

कुडाळातील विजप्रश्नी महावितरणला घेराव

89269

कुडाळ वीजप्रश्नी महावितरणला घेराओ

आमदार नाईक आक्रमक : समस्या मार्गी लावण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० : तालुक्यातील वीज समस्यांबाबत माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी आज येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराओ घालत जाब विचारला. गावागावांतील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या. आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून, या समस्यांवर काय उपाययोजना केली, याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी फोनवर चर्चा करीत जिल्ह्याच्या वीज स्थितीची माहिती दिली.
महावितरणकडे ठेकेदारांची कमतरता असल्याने वीज समस्या वेळीच मार्गी लागत नाहीत. त्यामुळे ठेकेदारांची पूर्तता करण्याची मागणी श्री. भागवत यांच्याकडे आमदार नाईक यांनी केली. कुडाळमध्ये दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. तासन्‌तास लोकांना अंधारात राहावे लागत आहे. पहिल्याच पावसात विजेची एवढी गंभीर समस्या झाली आहे. त्याकडे आपण स्वतः लक्ष देऊन त्या समस्या मार्गी लावा. लोकांच्या तक्रारी दूर करा, अशा स्पष्ट सूचना आमदार नाईक यांनी अधीक्षक अभियंता पाटील यांना दिल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, नागेश ओरोसकर, कौशल जोशी, महेश जामदार, तुषार सामंत, दिलीप निचम, अजित परब, बापू बागवे, एम. बी. गावडे, राजू गवंडे, बाळा वेंगुर्लेकर, संदीप सावंत, अमित राणे, दीपक आंगणे, अजित मार्गी, गौतमी गावकर, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com