चांगली सेवा द्या, अन्यथा
वीजबिले भरणार नाही

चांगली सेवा द्या, अन्यथा वीजबिले भरणार नाही

89277

चांगली सेवा द्या, अन्यथा
वीजबिले भरणार नाही

सावंतवाडीत लोकप्रतिनिधींचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : तालुक्यात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, साधी फ्यूज किंवा फ्यूजची तारसुद्धा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. वीज खांब आणि वाहिन्या गंजल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी केवळ आश्वासने देऊन ग्राहकांना गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करीत नुसती वसुली करू नका, तर चांगली सेवा द्या, अन्यथा बिले भरणार नाही, अशी भूमिका आज माडखोल, निगुडे, कास, मळगाव, तळवडे येथील लोकप्रतिनिधींनी मांडली.
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि लोकप्रतिनिधींनी आज येथील वीज कंपनीचे अधिकारी कुमार चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. तालुक्यात विविध ठिकाणी विजेच्या समस्या असून, त्याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये असलेल्या वीज समस्या उपस्थित सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधींनी चव्हाण यांच्यासमोर मांडल्या. वीज वाहिन्यांवर वाढलेली झाडेझुडपे तोडली नसल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. विद्युत खांब आणि वाहिन्या गंजलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह वीज कंपनीचे कर्मचारीही त्या ठिकाणी अपघातग्रस्त होत आहेत. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा. तालुक्यात ठिकठिकाणी विजेसंदर्भात दुर्घटना घडत आहेत, त्या रोखण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा याचा गंभीर परिणाम सहन करावा लागेल, असा इशारा देण्यात आला. सावंतवाडी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निगुडेचे माजी सरपंच शांताराम गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तळवडे तंटामुक्ती अध्यक्ष बाळा जाधव, मोहन गवस, भगवान परब, संतोष तावडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, मनोज घाटकर, श्रीराम आगरवडेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com