झाडांनाच खिळे ठोकून रोपवाटिकेचा प्रचार

झाडांनाच खिळे ठोकून रोपवाटिकेचा प्रचार

- rat११p१.jpg-
२४M८९३१७
साखरपा : झाडांना खिळे ठोकून लावलेले बॅनर.

झाडांनाच खिळे मारून रोपवाटिकेचा प्रचार

साखरपा, ता ११ : झाडांची काळजी घेणे हे रोपवाटिका चालकांचे आद्य कर्तव्य असताना एका रोपवाटिका मालकाने स्वत:च्या प्रचारासाठी झाडांनाच खिळे ठोकून स्वत:चे बॅनर जागोजागी लावले आहेत. याबाबत निसर्गप्रेमींकडून तीव्र आक्षेप व्यक्त होत आहे.
रोपवाटिकेत कोणत्याही झाडांची काळजी घेतली जाते. झाडांचे आरोग्य, त्याची वाढ यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. रोपवाटिकेत असलेल्या झाडांना विविध खाते, सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे, कीडनाशक फवारण्या आदी प्रकारे झाडांची काळजी घेतली जाते; पण एका रोपवाटिका मालकाने झाडांच्या आरोग्याचाच प्रश्न निर्माण केला आहे. त्याच्या रोपवाटिकेचा प्रचार करण्यासाठी गावागावातून स्वत:चे बॅनर लावले आहेत. हे बॅनर चक्क झाडांना खिळे ठोकून लावले असल्यामुळे निसर्गप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याकडची झाडे जणूकाही बेवारस आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिले जाते. या रोपवाटिकेने तसेच काहीसे वर्तन केलेले पाहावयास मिळत आहे. झाडांचे आरोग्य निरोगी राहण्याबाबत ज्यांच्याकडून काळजी घेणे आवश्यक असताना त्यांच्याचकडून अशा प्रकारचे वर्तन आक्षेपहार्य आहे. ही रोपवाटिका सरकारमान्य असल्याचे बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. सरकारी रोपवाटिकेकडूनच झाडांबाबत अशा प्रकारचे वर्तन आक्षेपार्ह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com