कणकवलीतील बैल बाजार इतिहासजमा

कणकवलीतील बैल बाजार इतिहासजमा

कणकवलीतील बैल बाजार इतिहासजमा कणकवलीतील बैल बाजार इतिहासजमा

89352
89342

कणकवलीतील बैल बाजार इतिहासजमा

शेतीचे यांत्रिकीकरण ः रासायनिक खत पध्दतीचाही परिणाम

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ ः कृषी क्षेत्रातील आधुनिकतेकडे लागलेल्या ओढ्यामुळे गो-धनाची संख्या घटू लागली आहे. पारंपरिक पद्धतीने औतासाठी बैलांची मागणी उन्हाळी हंगामात असते. यंदा मात्र बाजारात बैल खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण थंडावला होता. किंबहुना कणकवलीत मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी भरणारा बैलाचा बाजार आता इतिहासजमा झाला आहे. आता शेतकरी शेणखताऐवजी रासयनिक खते आणि संकरीत भात बियाणे वापरत असल्याने पारंपरिक शेतीवर परिणाम झाला आहे.
पूर्वी कोकणातील पारंपरिक शेती ही बैल जोडीच्या सहाय्याने केली जात होती. त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गुरे पाळत असत. मात्र, अलीकडे गुरे जोपासणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. तरीही ग्रामीण भागातील शेतकरी दुभती गाई-म्हैशी जतन करु लागले आहेत. बैलांचे जतन क्वचितच होताना दिसत आहे.
बैल खरेदी आणि विक्रीचा व्यवहार खरीप हंगामापूर्वी होतो. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आठवडा बाजाराच्या दिवशी बैल खरेदी व्यवहार होत असत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या विविध भागातून बैल विक्रीसाठी आठवडा बाजारात आणले जात असत. कणकवलीतील कांबळे गल्ली हा बैलबाजार कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होता. यंदा मात्र या बाजारात कमालीचा शुकशुकाट होता. किंबहुना येथे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नाही. जेथे बैलाचा बाजार भरत असे ती जागा आता मोकळी झाली आहे. अलिकडच्या वर्षात बैलांच्या किमतीचा कानोसा घेतला तर साधारण ३० ते ४० हजार रुपये बैलाची किंमत आहे. त्यामुळे सध्या बैल खरेदी केले जात नाहीत. शेतकऱ्यांनी गोधन पाळण्याकडे आता दुर्लक्ष केले आहे. याची कारणेही वेगळी आहेत. केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून यांत्रिकी शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात पावर टिलर, पावर विडर खरेदी केले जात आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धत कालबाह्य होऊ लागली आहे. पुर्वी गावातील शेतकरी शेतात शेणखताचा वापर करत होता. आता परिस्थिती बदलल्याने हेही सुत्र मागे पडले आहे. सध्या रासयनिक खते आणि संकरीत भात बियाणे वापरत असल्याने पारंपरिक शेतीवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात सद्यस्थितीत दुर्मिळपणे औताने शेती करणारे शेतकरी दिसून येत आहेत.
--------------
कोट
सद्यस्थितीत शेतकऱ्यांना बैलांचे पालन करणे परवडत नाही. गावातील तरूण पिढी ही नोकरी करण्याकडे वळत आहे. बैलांच्या किंमतीही वाढल्या आहेत. शेतीसाठी शेण खताऐवजी रासायनिक खते, संकरीत बियाणे वापरली जात आहेत. शिवाय पावर टिलर, पावर विडर हे शेतकऱ्यांना परवडणारे असतात. कमी वेळेत अधिक शेतीची लागवड होते. जिल्ह्यात यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
- विजय राणे, प्रयोगशिल शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com