‘अल्याड पल्याड’ चित्रपटात
स्थानिक कलाकारांना संधी

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात स्थानिक कलाकारांना संधी

89346

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात
स्थानिक कलाकारांना संधी

प्रतिभा चव्हाण ः शुक्रवारी प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः एस.एम.पी. प्रोडक्शनअंतर्गत ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट शुक्रवारी (ता. १४) प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून, ग्रामीण भागातील अनेक चेहरे दिसतील, अशी माहिती प्रोडक्शन मॅनेजर प्रतिभा चव्हाण यांनी दिली.
चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का विपुटकर आदी कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’मध्ये आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे, संकलन सौमित्र धरसुतकर, कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. कथा प्रीतम एस. के. पाटील यांची असून, पटकथा-संवाद संजय नवगिरे, वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी यांचे आहे. कार्यकारी निर्माते संतोष खरात, लाईन प्रोड्यूसर दीपक कुदळे-पाटील आहेत. रंगभूषा अभिषेक पवार व पार्श्र्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी स्वानंद देव व विष्णू घोरपडे यांनी सांभाळली आहे. हा थरार चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास प्रोडक्शन मॅनेजर प्रतिभा चव्हाण यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com