जांभेकर स्मारक इमारतीवर ''सोलर पॅनल''

जांभेकर स्मारक इमारतीवर ''सोलर पॅनल''

89350

जांभेकर स्मारक इमारतीवर ‘सोलर पॅनल’
जिल्हा नियोजनमधून निधीः जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख २८ हजार ६१५ रुपये सोलर पॅनल बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींगसाठी सातत्याने जिल्हा पत्रकार संघाने पाठपुरावा केल्याने एकूण ४७ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. आता पत्रकारांनी पर्यावरणाचा संदेश देत सोलर पॅनल बसवत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पत्रकार भवनातील या सोलर पॅनलमुळे वीज बिल मुक्ती मिळून व्यवस्थापन खर्च कमी होईल, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली.
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनामध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा नियोजनच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या इमारतीवर सोलर पॅनल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून या इमारतीमध्ये कॅन्टीन उभारण्यासाठी १८ लाखाचा निधी देखील समितीमधून देण्यात आला असून लवकरच कार्यारंभ आदेश मिळणार आहे. या सभागृहांमध्ये पत्रकार सभासदांच्या सूचना आल्यानंतर तातडीने टॉवर एसी मागणी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तातडीने ६ टॉवर एसी मंजूर केले असून त्यासाठी ९ लाख ४० हजार ९१८ रुपये निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार सघाने सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींगसाठी सातत्याने पाठपुरावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे केला होता. त्यामुळे तब्बल ४७ लाखाचा निधी मंजूर झाला असून कामे पूर्णत्वास जात आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे व श्री. पवार व बांधकाम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचेही चांगले सहकार्य मिळाले. जिल्हा नियोजनमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री चव्हाण, खासदार राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आभार मानत असल्याचे श्री. तोरस्कर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com