देवगडमध्ये ‘पदवीधर’साठी 
१६७८ मतदारांची नोंदणी

देवगडमध्ये ‘पदवीधर’साठी १६७८ मतदारांची नोंदणी

देवगडमध्ये ‘पदवीधर’साठी
१६७८ मतदारांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः कोकण पदवीधर निवडणुकीसाठी तालुक्यातून सुमारे १६७८ इतक्या पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. येत्या २६ जूनला तालुक्यात एकूण तीन केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांनी नामनिर्देश पत्रे सादर करण्याची मुदत संपली आहे. तसेच दाखल अर्जांची छाननीही झाली आहे. उद्या (ता. १२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे, तर प्रत्यक्ष २६ जूनला मतदान घेतले जाणार आहे. यासाठी येथील तहसीलदार कार्यालयातील मतदान केंद्रावर तालुक्यातील १०९७ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तर पडेल येथील केंद्रावर २१६ मतदार आणि शिरगाव येथील केंद्रावर ३६५ मतदार मतदान करतील. एकूण १६७८ इतके मतदार असून, त्यामध्ये नव्याने नोंदणी झालेले मतदारही समाविष्ट आहेत. यासाठी येथील निवडणूक विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. मतदानाच्या अनुषंगाने मतदार यादी निश्‍चित करण्यात आली आहे. देवगड, पडेल आणि शिरगांव केंद्रावर कोणते मतदार मतदान करतील, याचीही निश्‍चिती करण्यात आली असल्याची माहिती येथील निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली. दरम्यान, १ जुलैला मतमोजणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com