दमदार पावसामुळे शेतशिवारं गजबजली

दमदार पावसामुळे शेतशिवारं गजबजली

rat११p२३.jpg-
२४M८९३४०
राजापूर ः शेतामध्ये सुरू असलेली नांगरणी.

दमदार पावसामुळे शेतशिवारं गजबजली

राजापूर तालुका ; आजही बैलजोडीचा नांगरणीसाठी उपयोग

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः तालुक्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, बळीराजा सुखावला आहे. पावसाच्या आगमनामुळे खरीप हंगामातील भातशेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. नांगरणी आणि पेरणीची कामे सुरू झाली. शेतशिवारांमध्ये आता ‘सर्जा-राजा’च्या घुंगराचे आवाज कानी पडू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असून, ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. शेतीसाठी हा पाऊस पूरक असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. नांगरणीसाठी जमीन ओली झाल्यामुळे शेतकऱ्‍यांची शेतावर नांगरणीसह शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या शेतामध्ये नांगरणीच्या कामांसह पेरणीच्या कामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी अजूनही नांगरणीसाठी बैलजोडीचा उपयोग केला जात आहे. बैलांना जोडून जमिनीची नांगरणी केल्यास तुलनेने जमीन उंच नांगरली जाते. त्यात भातबियाण्यांची पेरणी केली तर जमिनीमध्ये बियाणं जास्त प्रमाणात गाडले जाऊन उशिरा रोपाची उगवण होते. त्यामुळे भाताची रोपे लावणीयोग्य होण्यासाठी उशीर होतो. या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून बैलजोडीद्वारे नांगरणी करून पेरणी करण्याऐवजी कुदळीच्या साहाय्याने जमीन खोदून भातपेरणी करण्यावर भर दिला जात आहे. शेतकऱ्‍यांकडून शेत नांगरणीच्या कामांसाठी बैलजोडीने नांगरणी करण्याच्या पारंपरिक पद्धतीसह आधुनिक पद्धतीच्या पॉवरटिलरसारख्या आधुनिक अवजारांचाही वापर केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com