आमदार नाईकांनी घेतली
चोडणेकर कुटुंबीयांची भेट

आमदार नाईकांनी घेतली चोडणेकर कुटुंबीयांची भेट

89369

आमदार नाईकांनी घेतली
चोडणेकर कुटुंबीयांची भेट

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : तळाशील येथे खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छीमाराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी चोडणेकर कुटुंबीयांची पदाधिकाऱ्यांसह भेट घेत त्यांना धीर दिला.
तळाशील खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असताना मुसळधार पाऊस व वाऱ्याच्या तडाख्यात मासेमारीची होडी उलटली. यात होडीतील किशोर चोडणेकर, धोंडिराज परब, लावण्य चोडणेकर हे तिघेही पाण्यात फेकले गेले. यात लावण्य हा पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला, तर चोडणेकर, परब हे दोघे बेपत्ता झाले. परब यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला, तर चोडणेकर हे अद्याप बेपत्ता आहेत. आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी तळाशील येथे जात चोडणेकर कुटुंबीयांची भेट घेतली. ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी चोडणेकर कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, यतीन खोत, सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, आदित्य पेडणेकर, संजय केळुसकर, सुहास कोचरेकर, रवी कोचरेकर, सिद्धेश मांजरेकर, जयदेव लोणे, संजय जुवाटकर, हर्षद चोडणेकर, जयहरी कोचरेकर, कीर्तिराज चोडणकर, निखिल पेडणेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com