नारायण राणेंना देवगडमध्ये
सर्वच केंद्रांवर मताधिक्य

नारायण राणेंना देवगडमध्ये सर्वच केंद्रांवर मताधिक्य

89389

नारायण राणेंना देवगडमध्ये
सर्वच केंद्रांवर मताधिक्य

प्रणाली माने ः विकासकामांची पोचपावती

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावर मताधिक्य मिळाले आहे. शहरातून श्री. राणे यांना २५२४ इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नीतेश राणे यांच्या कार्याची पोचपावती यातून मिळाली असल्याचा दावा भाजप नगरसेविका प्रणाली माने यांनी जामसंडे येथे पत्रकार परिषदेत केला.
जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात सौ. माने यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल, बाळ खडपे, वैभव बिडये, उषःकला केळुसकर, उल्हास मणचेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. माने म्हणाल्या, ‘‘देवगड-जामसंडे शहरातील सर्वच मतदान केंद्रावर महायुतीने आघाडी घेतली. एकूण ११ हजार २२३ मतदारांपैकी ७२४० इतक्या मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना ४७२९ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना २२०५ इतकी मते मिळाली. यातून श्री. राणे यांना २५२४ इतके मताधिक्य मिळाले आहे. विकास कामांची पोचपावती मतपेटीतून मिळाली आहे. याबाबत मतदारांचे आभार.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com