सिंधुदुर्गात बौध्द चळवळ वृध्दिंगत करा

सिंधुदुर्गात बौध्द चळवळ वृध्दिंगत करा

swt1121.jpg मध्ये फोटो आहे.

कट्टा ः आयोजित श्रामणेर शिबिरात पूज्य भंते विशुद्धी बोधी यांनी मार्गदर्शन केले.


सिंधुदुर्गात बौद्ध चळवळ वृद्धिंगत करा
विशुद्धी बोधी ः कट्टा येथे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. भारतीय बौध्द महासभेच्यावतीने २४ प्रकारची प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतात. ही सर्व शिबिरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात यावी. या शिबिरांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बौध्द चळवळ गतिमान करावी, असे प्रतिपादन पूज्य भंते विशुध्दी बोधी यांनी कट्टा येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व तालुका शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे आयोजित बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा समारोप पूज्य भंते विशुद्धी बोधी व केंद्रीय शिक्षक विद्याधर देशमुख, जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरामध्ये दहा दिवसांच्या कालावधीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी पुज्य भंते विशुद्धी बोधी यांनी बौद्ध धम्माबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी बौध्दाचार्य श्रामणरे शिबिराचे महत्त्व विशद केले. समारोप कार्यक्रम प्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, हिशोब तपासणीस भाऊ कासार्डेकर, जिल्हा जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, सचिव सुनील जाधव, संरक्षण उपाध्यक्ष दिलीप कदम, सचिव प्रचार पर्यटन उपाध्यक्ष भीमराव जाधव, मालवण तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, कणकवली तालुकाध्यक्ष भाई जाधव, सरचिटणीस सुभाष जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष नीलेश वर्देकर, सरचिटणीस रामचंद्र वालावलकर, कोषाध्यक्ष आर. डी. कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय नेमळेकर, सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कोषाध्यक्ष सुनील जाधव, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, सरचिटणीस रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
या दहा दिवसीय निवासी श्रामणेर शिबिरात जनीकुमार कांबळे, पं. ध. माणगावकर, दीपक कांबळे, राघोजी चेंदवणकर, दीपक कदम, सहदेव कदम, सूर्यकांत कदम, विलास वळंजू, अजय कदम, शंकर कदम, प्रकाश कांबळे, केंद्रीय शिक्षक विजय जाधव यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये जिल्ह्यातील वीस शिबिरार्थी सहभागी झाले. शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुका पदाधिकारी तसेच संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, योगेश वराडकर, संकेत पेंडूरकर, शंकर कदम, अमित पवार, संदीप कदम, विलास वळंजू, तळगावकर, गणेश वराडकर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आर. डी. चेंदवणकर यांनी, सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com