वादळी पावसामुळे देवगडात नुकसान

वादळी पावसामुळे देवगडात नुकसान
Published on

९१५६६
९१५६७

वादळी पावसामुळे देवगडात नुकसान
घराच्या छतांचे नुकसान; महसूल यंत्रणेकडून पाहाणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः तालुक्याच्या किनारी भागात काल (ता.२०) झालेल्या पावसाने ठिकठिकाणी नुकसानी केली. वादळी वाऱ्याने आरे भागातील घरांची कौले, पत्रे उडून मोठे नुकसान झाले. तसेच मिठबांव भागातही नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेकडून नोंद घेण्यात आली असल्याची माहिती नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी दिली.
किनारी भागात काल गडगडाटासह पाऊस झाला. वादळी वारा गेल्याने आरे भागात घरांचे नुकसान झाले. तेथील एका घराची सुमारे एक हजार कौले, ३३ पत्रे तसेच वासे, रीप, एक माड, काजू ५०, कलमे २ आणि एक चिकूचे झाड मिळुन सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. एका घराचे ६० पत्रे, तीन झाडे मिळून सुमारे चार लाखाचे, एका घराचे ७० पत्रे उडून सुमारे ७० हजाराचे, अन्य एका घराचे ३३ पत्रे, काजू १५ आणि कलमे ३० यांचे सुमारे चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तसेच मिठबांव येथे एका घरावर झाड पडून इमारतीचे सुमारे २० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली. दरम्यान, गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे १७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात ५२८ मिलीमीटर इतका पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com