कामगार नोंदणीसाठी सहकार्य करा

कामगार नोंदणीसाठी सहकार्य करा

Published on

कामगार नोंदणीसाठी सहकार्य करा

संघटनेची मागणी ः दोडामार्गात प्रशासनाला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ : तालुक्यातील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरणासाठी सहकार्य करावे, अशी मागणी बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्गच्या संचालक सदस्य जेनिफर लोबो व सदस्य दीपक जाधव यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यात बांधकाम कामगार नोंदणीचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे कामगार शासकीय योजनांपासून वंचित आहे. ही नोंदणी अधिकाधिक होण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेमार्फत प्रयत्न सुरू आहेत. या नोंदणीसाठी ग्रामसेवकांच्या दाखल्याची आवश्यकता आहे; मात्र तालुक्यातील काही ग्रामसेवक सही करण्यास नकार देत असल्यामुळे वंचित कामगारांच्या नोंदण्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी दोडामार्ग तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक आयोजित करून संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे व चर्चाविनिमय करून यावर तोडगा काढावा.
कामगारांमध्ये गवंडी, सुतार, मेस्त्री, वेल्डर, सेंट्रींग कामगार, फरशी बसविणारे कामगार, पेंटर, लोहार, मिक्सर चालविणारे, वायरमन, वीटभट्टी कामगार, प्लंबर, स्लायडिंग कामगार, खाणकाम करणारे, पॉलिश कामगार, खोदाई मशिनवाले, दगड कापणारे, मदतनीस आदी कामगार या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. कामगारांना व संघटनेस सहकार्य करून तालुक्यात जास्तीत जास्त कामगार नोंदणी होण्यास मदत करण्याची मागणी बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग सदस्य लोबो व जाधव यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
92412

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com