यश प्राप्तीनंतर गावाचे ऋण फेडा

यश प्राप्तीनंतर गावाचे ऋण फेडा

Published on

यश प्राप्तीनंतर गावाचे ऋण फेडा

भिकाजी धुरी ः मडुरा प्रशाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता.१ः शालांत परीक्षेत मडुरा हायस्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उच्च शिखरे सर करावीत. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न करावेत. यश प्राप्तीनंतर गावाकडेही वळून पाहा, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ निवृत्त प्राचार्य भिकाजी धुरी यांनी व्यक्त केले.
मडुरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. धुरी बोलत होते. व्यासपीठावर शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य समीर कोलते, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष रोहिणी गावडे, मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सायली परब आदी उपस्थित होते.
यावेळी उदय धुरी यांनी, ग्रामीण आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाशिवाय ९५ टक्के प्राविण्य मिळवणे, हेच मुळात ग्रामीण भागासाठी भूषणावह आहे, असे सांगत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. सुरेश गावडे यांनी, माध्यमिक शाळेत यशस्वी झालेले आपले विद्यार्थी पुढे कॉलेजमध्येही चमकले पाहिजेत. त्यांनी पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. यावेळी मडुरा हायस्कूलमधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी मानस कोलते, ऋतुजा नाईक, विनीत पंडित, ऋषिकेश पंडित व जान्हवी पंडित यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रिद्धी मडुरकर हिने सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सायली परब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुरेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सुहास वराडकर यांनी आभार मानले.
93877

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.