बेफाम तरुणाईला लगाम हवा

बेफाम तरुणाईला लगाम हवा

बेफाम तरुणाईला लगाम हवा

प्रकाश गवस ः फोंडाघाट येथे अमली पदार्थ विरोधी दिन

फोंडाघाट,ता. ३० ः तरुणाईची बेपर्वाई अतिशय वाईट गोष्ट आहे. आपल्या पाठीमागे कोणीतरी वाट बघत आहे, याची जाणीव नसणे ही घातक गोष्ट समाजात आहे. एकवेळ जेवण त्याग करतात. पण, अमली पदार्थ त्याग करत नाहीत. ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार प्रकाश गवस यांनी केले.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेना विभाग व जिल्हा वाहतूक शाखा, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
प्रास्ताविकामध्ये डॉ. राज ताडेराव म्हणाले की, ‘‘मागील काही कालावधीतील घडामोडींचा विचार केला तर व्यसनाधीन तरुण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.’’ आपल्या मनोगतात डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, ‘‘व्यसन ही एक समाजाला लागलेली कीड आहे. अमली पदार्थातून आपण दारिद्र्य विकत घेतो. अमली पदार्थ विकणारी कंपनी आपल्या जीवावर श्रीमंत होतात ज्यांचे आपण फॅन आहोत. त्यामुळे आपण यापासून सावध राहिले पाहिजे. आपले जीवन समृद्ध करण्यासाठी व्यसने दूर ठेवली पाहिजेत.’’ डॉ. राज ताडेराव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष जोईल यांनी आभार मानले. डॉ. सतीश कामत, प्रा. संतोष आखाडे, प्रा. जगदीश राणे, प्रा. नारींगकर, प्रा. ए.के.पाटील आदी उपस्थित होते.
---
घातक गोष्टींपासून सावध राहा
पोलिस हवालदार गवस म्हणाले, ‘‘अमली पदार्थांचा खर्च मोठा असतो. शिवाय अनेक आजार बळावतात आणि औषधाला प्रचंड खर्च करतात. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलमडते आणि पुन्हा व्यसनाकडे ही पिढी झुकते. व्यसनापासून दूर राहणे हे एक आव्हान आहे. प्रलोभनाला बळी पडणरी तरुणाई बेफाम होता कामा नये. याची काळजी घेतली पाहिजे. अनोळखी व्यक्तीकडून काही खाऊ नका. प्रवासामध्ये असे अनेक प्रसंग येतात त्यावेळी आपण फार सावध राहिले पाहिजे. अन्यथा आपली लूट निश्चित आहे. समाजातल्या घातक गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे.’’
93859

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com