लोकसभेत २२ खासदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ

लोकसभेत २२ खासदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ

Published on

लोकसभेत २२ खासदारांची संस्कृतमधून शपथ
मध्यप्रदेशातील आठ सदस्यांचा समावेश; भर्तृहरी महताब हंगामी अध्यक्ष नियुक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे यातील एकूण २२ खासदारांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. मध्यप्रदेशमधील ८, दिल्ली, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिसा, राजस्थान येथून प्रत्येकी गुजरातमधून २, उत्तरप्रदेश ३ अशा एकूण २२ खासदारांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यानंतर सतरावी लोकसभा विसर्जित केल्यानंतर अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २५ जूनपासून सुरू झाले. देशाच्या विविध राज्यातील लोकसभा मतदार संघात विजय प्राप्त करून निवडून आलेल्या खासदारांना लोकसभेच्या अध्यक्षांकडून शपथ दिली जाते; मात्र अठराव्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भर्तृहरी महताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. या वेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २८० व दुसऱ्या दिवशी २६४ खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. यातील २२ खासदारांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.
विशेष म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे व सध्याचे मेरठचे खासदार अरूण गोविल यांनीही संस्कृतमधून शपथ घेतली. यापूर्वी भारताच्या दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देखील संस्कृतमधून शपथ घेतली होती. आपल्या आईचा मान राखत त्यांची कन्या बांसुरी स्वराज यांनीही संस्कृतमधून शपथ घेतली. पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनीही संस्कृतमधून शपथ घेतली.

कोट
देवभाषा प्राचीन भाषा म्हणून सुविख्यात असलेली संस्कृत भाषा सध्याच्या काळात अनेकांना आकर्षित करते आहे; मात्र कालौघात या भाषेचे जतन व संवर्धन होणेदेखील गरजेचे आहे; मात्र स्वतः लोकशाहीचे एक अविभाज्य भाग असलेल्या खासदारांनी संस्कृत भाषेची शपथ घेण्यासाठी निवड केली, हा कित्येकांना प्रेरणा देणारा भाग आहे. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि रत्नागिरी येथील डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र संस्कृत प्रचारासाठी काम करत आहे. यात रत्नागिरीकरांनी सहभाग घ्यावा.
- डॉ. दिनकर मराठे, संचालक, संस्कृत उपकेंद्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.