बाजार बॉईज ग्रुपतर्फे परुळे येथे वृक्षारोपण

बाजार बॉईज ग्रुपतर्फे
परुळे येथे वृक्षारोपण
Published on

बाजार बॉईज ग्रुपतर्फे
परुळे येथे वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २ ः राज्य कृषी दिनाचे औचित्य साधून आणि पर्यावरणाची गरज ओळखून परुळे येथील येसुआका सड्यावर बाजार बॉईज ग्रुप परुळेबाजारच्या सदस्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी १०० झाडे लावून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प केला.
या मोहिमेत वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, अर्जुन या झाडांची लागवड करण्यात आली. जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा ढासळलेला असमतोल, जमिनीची धूप आणि पाण्याचा वाढता तुटवडा अशा अनेक समस्यांवर वृक्षारोपण हा एकमेव उपाय असून, त्यामुळे पुढील पिढीला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमात सृष्टी देसाई या सहा वर्षीय मुलीने सहभाग घेतला. तिच्या उत्साहाचे उपस्थितांनी कौतुक केले. जास्तीत जास्त झाडेलावा व ती जगविण्याचा संकल्प करा, आवाहन बाजार बॉईज ग्रुपच्यावतीने यावेळी करण्यात आले.
94105

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com