

परुळेबाजार ग्रामपंचायतीतर्फे
कृषिदिन विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २ ः परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कृषिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने परुळेबाजार ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले.
यावेळी वृक्षारोपण करून शाळा व अंगणवाडीतील मुलांना झाडांची रोपे देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, सीमा सावंत, पूनम परुळेकर, नमिता परुळेकर, पुरुषोत्तम प्रभू, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, शांताराम परुळेकर, कानू परुळेकर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी (कै.) वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.
94106
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.