पारंपरिक शेतीला हवी तंत्रज्ञानाची जोड

पारंपरिक शेतीला हवी तंत्रज्ञानाची जोड
Published on

पारंपरिक शेतीला हवी तंत्रज्ञानाची जोड

मकरंद देशमुख ः कुडाळ पंचायत समितीतर्फे कृषिदिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. आजच्या घडीला विविध कारणांनी शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत आहे. हे चक्र उलटे फिरवून पारंपरिक शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी क्षेत्रात क्रांती करा, असे आवाहन सिंधुदु‌र्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी येथील जिल्हास्तरीय कृषिदिन कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कृषिदिन कार्यक्रम सोमवारी (ता. १) कुडाळ पंचायत समिती सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन सीईओ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा कृषी विकास अधिकारी जानबा झगडे, लक्ष्मण खुरकुटे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक नामदेव परीट, जिल्हा कृषी अधिकारी विद्येश अंधारी, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, तंत्र अधिकारी रवींद्र पाटील, कृषी पर्यवेक्षक अमोल करंदीकर, किसान संघाचे जयराम परब, सूर्यकांत कुंभार, गोविंद चौगुले, श्री. धामापूरकर, विस्तार अधिकारी संदेश परब, मंदार पाटील, दत्ताराम आंबेरकर, महादेव खरात आदी उपस्थित होते.
बांबू लागवड विषयावर प्रगतशील शेतकरी मिलिंद पाटील, भात-स्थानिक वाण संवर्धन व विक्री व्यवस्थापन विषयावर सचिन चोरगे, भात लागवड व्यवस्थापनावर डा. वाय. सी. मुठाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंगेश कदम, देवेंद्र नारकर, सदानंद गवस, रवींद्र गावडे, अर्जुन रेडकर, बाबा पाटणकर, प्रभाकर डाफळे, राजाराम गुरव, संतोष पडवळ, श्री. राणे या प्रगतशील शेतकऱ्यांसह सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, ग्रामसेवक श्रद्धा आडेलकर, प्रियांका चव्हाण, भूषण चव्हाण, नमता म्हाडेश्वर, वासुदेव कसालकर, प्रसन्ना म्हाडगुत, विस्तार अधिकारी महादेव खरात, सानिका पालव, सतीश साळगावकर, संतोष खोत यांचा सत्कार करण्यात आला. कृषी अधिकारी बाळकृष्ण परब यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी जानबा झगडे यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी स्वागत केले. या कार्यक्रमापूर्वी पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सीईओ देशमुख यांच्या हस्ते देशी बियाणे बॅंक व विक्री केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.
---
शेतकऱ्यांनो, प्रयोगशील राहा!
श्री. देशमुख म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावे. पारंपरिक पिकांसोबत नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाची कास धरा. प्रयोगशील राहा. आंबा, काजू पिकांवर अवलंबून न राहता ऊस लागवडीकडे वळा. बांबू लागवडीत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे. बांबू लागवडीत जिल्ह्याने राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे, तसाच आदर्श शेतीतून निर्माण करा. पारंपरिक शेतीसोबत प्रगत तंत्रज्ञानाला जोड द्या. पडीक क्षेत्र ठेवू नका. पडीक क्षेत्रात लागवड करा. यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल.’’ श्री. राऊत यांनीही मार्गदर्शन केले.
94242

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com