कृषी पर्यटकांची किल्ले पारगडला भेट

कृषी पर्यटकांची किल्ले पारगडला भेट

कृषी पर्यटकांची किल्ले पारगडला भेट

‘सह्याद्री’चा उपक्रम ः दाणोलीत कृषिदिन उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्यावतीने इंदू गार्डन व सुकी कृषी पर्यटन केंद्र, दाणोली येथे कृषी पर्यटन दिन व कृषिदिन साजरा झाला. यानिमित्त संस्थेच्यावतीने वर्षा कृषी पर्यटन व पारगड किल्ला दर्शन या एकदिवशीय सहलीचे आयोजन केले होते. या सहलीमध्ये जिल्ह्यातील २७ पर्यटक सहभागी झाले.
कृषिदिन कार्यक्रमास प्रमुख अतिथी जितेंद्र पंडित, तालुकाध्यक्ष व केंद्रीय पर्यटन धोरण समिती सदस्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यटन महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी भूषविले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर, संस्था संचालक प्रमोद सावंत, जोश कन्नाई, भरत गावडे, धर्माजी गावडे, नंदकिशोर दळवी व मेड फॉर यू पर्यटक केंद्राचे श्री. तारी तसेच मामाचो गाव कृषी पर्यटन केंद्राचे सर्वेसर्वा व संस्थेचे तज्ज्ञ संचालक अनंत सावंत व सर्व संचालक, पंचक्रोशीतील मान्यवर डॉ. लवू सावंत, हनुमंत गवस, दाणोली माजी सरपंच प्रशांत सुकी, संदीप सुकी, विश्वनाथ राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. संदीप व विभावरी सुकी दाम्पत्याने नव्याने स्थापन केलेल्या इंदू गार्डन व सुकी कृषी पर्यटन केंद्राचा औपचारिकरित्या प्रारंभ करण्यात आला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यानिमित्त आयोजित वर्षा कृषी पर्यटन व पारगड किल्ला दर्शन या एकदिवशीय सहलीमध्ये जिल्ह्यातील २७ पर्यटकांनी सहभाग घेतला. बहुतांशी कृषी पर्यटक हे ज्येष्ठ नागरिक होते. यात सावंत फार्म, माडखोल धरण, केसरी मत्स्यालय, आंबोली धबधबा व पर्यटन पॉईंट, डार्क फॉरेस्ट कृषी पर्यटन केंद्र तसेच कुंभवडे बाबा धबधबा व किल्ले पारगड मोहीम सर्वांनी पूर्ण केली. सहलीचे सूत्रसंचालन टूर ऑपरेटर संचालक भरत गावडे यांनी यशस्वीरित्या सांभाळले. त्यांना सचिव धर्माजी गावडे, मंगेश परब यांनी मदत केली. कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिरोडकर यांनी शासनाच्या कृषी पर्यटन धोरणाचा उहापोह केला. सेवासवलतींचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
94237

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com