मिलाग्रीस हायस्कूलला फिल्टर प्लांट

मिलाग्रीस हायस्कूलला फिल्टर प्लांट

Published on

मिलाग्रीस हायस्कूलला फिल्टर प्लांट
सावंतवाडी ः येथील मिलाग्रीस हायस्कूल व प्री प्रायमरी स्कूलमध्ये अर्चना फाउंडेशनच्यावतीने फिल्टर प्लांट बसवून देण्यात आला. शालेय मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, शुद्ध पाणी मिळावे यासाठी हा प्लांट बसविण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब म्हणाल्या. पावसाळी दिवसांत दुषित पाण्यापासून होणारे आजार, रोगराई यापासून शालेय विद्यार्थ्यांच रक्षण व्हावे, यासाठी अर्चना फाउंडेशच्यावतीने फिल्टर प्लांट भेट स्वरूपात देण्यात आला. मुलांचे आरोग्य सुदृढ रहावे, ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे आपण देणे लागतो. शाळेला मदत करणे कर्तव्य आहे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. घारे यांनी स्पष्ट केले‌‌. याप्रसंगी मिलाग्रीस हायस्कूलचे फादर रिचर्ड सालदाना, हिदयतुल्ला खान, विद्यार्थी अध्यक्ष ह्रतिक परब, इलियास आगा, तौसिफ आगा, पूजा दळवी, नॉबर्ट माडतीस, शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.
94238

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.