जिल्हा बॅंकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा बॅंकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Published on

जिल्हा बॅंकेतर्फे गुणवंतांचा सत्कार

वर्धापन दिन उत्साहात ः सिंधुदुर्गनगरीत विविध उपक्रमांना प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सोमवारी (ता.१) ४२ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त मायक्रो एटीएममध्ये सर्व बँकांचे फीचर्सचा समावेश करण्यात आला. त्याच्या प्रारंभासह रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, जिल्ह्यातील दहावी, बारावीतील प्रथम तीन विजेते विद्यार्थी, कर्मचारी गुणवंत पाल्य तसेच पिग्मी एजंट यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी बँकेचा ४१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात बँकेचा वाढदिवस उत्साहात झाला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, व्हिक्टर डान्टस, बाबा परब यांच्यासह अधिकारी, पिग्मी एजंट, दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी, संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४१ जणांनी रक्तदान केले. बँकेच्या प्रधान कार्यालय परिसरात जांभूळ झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. बँकेने सुरू केलेल्या घरपोच सेवामधील ‘मायक्रो एटीएम’मध्ये केवळ जिल्हा बँकेचे कार्ड चालत होते; मात्र आजपासून नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला. मायक्रो एटीएम डिव्हाईसमध्ये सर्व बँकांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता केवळ जिल्हा बँकेचेच नाही तर सर्व बँकांचे एटीएम चालणार आहे. त्याचाही प्रारंभ यावेळी करण्यात आला.
याशिवाय जिल्ह्यात दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अल्पबचत सुविधा अंतर्गत चांगले काम केलेल्या अभिजित वंजारे (घोटगे), विष्णू जोशी (आरोंदा), रवींद्र आदम (पडेल) यांचा सत्कार करण्यात आला. पिग्मी एजंटमधून सर्वोत्कृष्ट काम केलेल्या सुनील सांबारी, कमल तिरवडेकर (कुडाळ) आणि श्री. घुबडे (दोडामार्ग) यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर चांगले काम केलेल्या पाच विकास संस्थांच्या सचिवांनाही गौरविण्यात आले.
94255

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com