वीज ग्राहकांचा उद्या कुडाळात ‘जनता दरबार’

वीज ग्राहकांचा उद्या
कुडाळात ‘जनता दरबार’
Published on

वीज ग्राहकांचा उद्या
कुडाळात ‘जनता दरबार’
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहकांच्या जनता दरबारचे आयोजन राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये गुरुवारी (ता. ४) केले आहे. याच्या पूर्वतयारीसाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक उद्या (ता. २) सकाळी ११ वाजता येथील पालिकेच्या पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये आयोजित केली आहे. सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे. जनता दरबार पूर्वतयारीसाठी सर्व तालुका कार्यकारिणींना तालुकावार बैठका घेऊन नियोजन करण्याचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट व सचिव निखिल नाईक यांनी सूचित केले आहे. होगाडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जनता दरबारमध्ये जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचा अभ्यास व निराकरण करण्याचे प्रयत्न केले जाणार असून, वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यात येणार आहे. कुडाळ येथे जनता दरबारासाठी जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
--
निरवडे ग्रामपंचायतीत
शुक्रवारी कृषी मेळावा
सावंतवाडी ः शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याबरोबरच शासनाच्या आधारभूत किंमत भात खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणीद्वारे सातबारा व चालू हंगामातील पिकाची नोंद होणे आवश्यक आहे. दरवर्षी बरेच शेतकरी ई-पीक पाहणीअभावी या योजनेपासून वंचित राहतात. शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक ज्ञान होणेही गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायत निरवडे व सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ५) सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे कृषी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com