दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

Published on

दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

कासार्डेत उपक्रम ः याराना मित्र परिवाराचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ : याराना मित्र परिवाराच्या वतीने कासार्डे दशक्रोशीतील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांतील अनाथ दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण प्रत्येक शाळांमध्ये जाऊन करण्यात आले. दत्तक विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचे सलग सहावे वर्ष होते.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९९०-९२ च्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या याराना मित्र परिवार या संस्थेच्या माध्यमातून ‘शिक्षण पालकत्व योजना’ गेली सहा वर्षे यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण पालकत्व योजनेसाठी निवडलेल्या अनाथ विद्यार्थ्यांना दरवर्षी संपूर्ण शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. यावर्षी कासार्डे दशक्रोशीतील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जाऊन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गवाणे प्राथमिक शाळा क्रमांक १, गवाणे हायस्कूल, कासार्डे हायस्कूल, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे, नाधवडे हायस्कूल, ब्राह्मण देव नाधवडे शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे आदींचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी याराना मित्र परिवाराचे सदस्य दिलीप शेलार, संतोष पालकर, विलास डंबे, अरुण लाड, प्रकाश चव्हाण, विजय राणे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
94262

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.