रत्नागिरी- डॉक्टर दिनानिमित्त रत्नागिरीत डॉक्टरांचा सन्मान

रत्नागिरी- डॉक्टर दिनानिमित्त रत्नागिरीत डॉक्टरांचा सन्मान

94234

रत्नागिरीत डॉक्टरांचा सन्मान
आयएमएचे आयोजन ; उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : आयएमए रत्नागिरी शाखेतर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा आयएमएचे अध्यक्ष डॉ. अतुल ढगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी कुशल व्यवस्थापनाने जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवून आणल्याबद्दल रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, मानसिक आरोग्यसेवांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांचा आयएमए रत्नागिरीच्या पूर्व अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष डॉ. ढगे यांनी डॉक्टरांच्या अद्वितीय योगदानाचे कौतुक केले. डॉ. मतीन परकार यांनी उपस्थितांना हार्ट फेल्युअर या विषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स नेत्र रुग्णालय, आनंदघर अशा विविध संस्थांत कार्यरत डॉ. संतोष बेडेकर यांचा, परकार फाउंडेशनमार्फत काम करणारे ज्येष्ठ डॉ. अलिमियॉं परकार, आर्ट सर्कलसाठी उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. रवींद्र गोंधळेकर आणि डॉ. मेधा गोंधळेकर यांचा सन्मान डॉ. ढगे यांच्या हस्ते केला. एड्सग्रस्तांसाठी कार्य, माहिती, शिक्षण आणि जनजागृती करणाऱ्या डॉ. रश्मी आठल्ये, अनेक दाम्पत्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. तोरल शिंदे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. कल्पना मेहता, माइंडकेअर मॅरेथॉन, जागर मनोआरोग्याचा, मनोमित्र कार्यशाळा घेणारे डॉ. ढगे यांचा सन्मान डॉ. भास्कर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. गरीब आणि वंचित व्यक्तींसाठी अनेक उपक्रम राबवणारे डॉ. शरद प्रभुदेसाई, अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींच्या व्यवसाय पुनर्वसनासाठी कार्य करणारे डॉ. शाश्वत शेरे, नाट्यक्षेत्रातील डॉ. शशांक पाटील, डॉ. नीलेश नाफडे यांचा सन्मान डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केला.
विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे डॉ. समीर जोशी, वीरश्री ट्रस्टच्या माध्यमातून वंचित मुलांना आर्थिक मदत करणारे डॉ. नीलेश शिंदे, वेबसीरिज, चित्रपट निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या डॉ. नितीन चव्हाण यांचा सन्मान डॉ. संघमित्रा फुले यांनी केला. पक्षी छायाचित्रण करणारे डॉ. उदय वंडकर, मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करणाऱ्या डॉ. विवेक पोतदार, नाट्यलेखक, वक्ते, डॉ. निनाद नाफडे यांचा सन्मान आयएमएचे सचिव डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी केला. सूत्रसंचालन डॉ स्मृती प्रभुदेसाई व निकिता वाघमारे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com