दाभोळ ः कृषी विद्यापिठाचे युटयुब चॅनल शेतकऱ्यांसाठी खुले

दाभोळ ः कृषी विद्यापिठाचे युटयुब चॅनल शेतकऱ्यांसाठी खुले

Published on

94231

विद्यापिठाचे यु ट्युब चॅनल शेतकऱ्यांसाठी खुले
कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते उद्घाटन; कृषिदिनानिमित्त विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २ : कोकण कृषी विद्यापिठाच्या यु ट्युब चॅनलचे उद्घाटन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. या यु ट्युब चॅनलच्या माध्यमातून विद्यापिठाचे संशोधन शेतकरी आणि कृषी आधारित उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपयोग करावा, असे आवाहन डॉ. भावे यांनी केले.
कृषिदिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात हे यु ट्युब चॅनल लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. भावे यांची ही संकल्पना आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या दापोलीच्या मुख्यालयाच्या परिसरात आणि विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व घटक महाविद्यालये, सर्व संशोधन केंद्रे, कृषी विज्ञानकेंद्रे येथे वृक्षारोपण करण्यात आले. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आंब्याच्या विविध जातींची सुमारे २ हजार कलमांची लागवड केली. विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते सोनपरी या आंब्याच्या जातीच्या कलमांचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्यानविद्या विभागाच्या गोवा माणकूर बागेमध्ये वृक्षारोपण करून आरंभ झाला. या वेळी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर आणि उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर विद्यापिठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्व. डॉ. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालनालयामध्ये नव्यानेच उभारण्यात आलेल्या प्रसारमंथिनी परिषद दालनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. भावे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यापिठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक निर्बाण, डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे माजी व्यवस्थापक डॉ. दीपक हर्डीकर आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी डॉ. पराग हळदणकर , शिक्षण संचालक, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. संतोष वरवडेकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.