बांद्यात रिक्षाचालकांनी 
श्रमदानाने खड्डे बुजविले

बांद्यात रिक्षाचालकांनी श्रमदानाने खड्डे बुजविले

Published on

बांद्यात रिक्षाचालकांनी
श्रमदानाने खड्डे बुजविले

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ ः बांदा-पत्रादेवी मार्गावर पडलेले खड्डे आज बांदेश्वर मंदिर रिक्षा चालक-मालक संघटनेने श्रमदानातून बुजविले. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वेळोवेळी लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
बांदा-गोवा पत्रादेवीकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यापूर्वी खड्डे पडून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. बांदा ग्रामपंचायतीने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने सर्वच वाहतूकदारांनी शासन व ग्रामपंचायतीवर नाराजी व्यक्त केली होती. अखेर बांदेश्वर मंदिर येथील रिक्षा संघटनेने आज स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्यात पडलेले खड्डे बुजविले. यासाठी रिक्षा व्यवसाय बंद ठेवत भर पावसात भिजत सर्व वाहन चालकांसाठी मेहनत घेतली. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष उल्हास शेवडे, सुनील माजगावकर, दशरथ परब, संजय नाईक, अनिल म्हाडगुत, अनिल माजगावकर, देवानंद कुबल, प्रशांत म्हाडेश्वर, विशू पावसकर आदी उपस्थित होते. यापुढे देखील बांदेश्वर मंदिर रिक्षा संघटना सामाजिक कार्यात सक्रिय राहणार असल्याचे अध्यक्ष शेवडे यांनी सांगितले. खड्डे बुजविल्याने स्थानिक वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
94270

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.