रत्नागिरी-दिली शंभर पुस्तकांची भेट

रत्नागिरी-दिली शंभर पुस्तकांची भेट

Published on

94003

रांगणेकर दाम्पत्याकडून
संस्कृत उपकेंद्राला पुस्तके भेट
रत्नागिरी, ता. १ : शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीकांत रांगणेकर व पत्नी सुपर्णा रांगणेकर यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापिठाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राला १०० हून अधिक पुस्तके भेट स्वरूपात दिली.
रांगणेकर दाम्पत्याने (कै.) गणेश महादेव रांगणेकर व (कै.) श्रीमती शारदा गणेश रांगणेकर आणि (कै.) वसंत दामोदर सरदेशपांडे व (कै.) श्रीमती माया वसंत सरदेशपांडे यांच्या स्मरणार्थ ही पुस्तके आज सुपुर्द केली. यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत साहित्य, संस्कृत व्याकरण, आरोग्य, आयुर्वेद, योगशास्त्र, पुरातन विषयावर विवेचन करणाऱ्या अशा शंभराहून अधिक दुर्मिळ, मौलिक ग्रंथ व पुस्तकांचा समावेश आहे. यामुळे रत्नागिरी उपकेंद्राच्या ग्रंथ संपदेत वाढ झाली आहे. या ग्रंथसंपदेत पद्मश्री आणि पद्मविभूषण पंडित विद्यानिवास मिश्र यांच्या भाषा चिंतन या २१ खंडाचा समावेश आहे. आदि शंकराचार्य यांचे तत्त्वज्ञान, पुराणसाहित्य यावर आधारित ग्रंथाचा समावेश आहे.
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी रांगणेकर दाम्पत्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पुरातन, अत्यंत अमुल्य ग्रंथ, हस्तलिखिते उपलब्ध असल्यास ती उपकेंद्राच्या ग्रंथालयासाठी भेट स्वरूपात देण्याचे आवाहन डॉ. दिनकर मराठे यांनी रत्नागिरीकरांना केले.

- बातमीदार- मकरंद पटवर्धन... १.७.२०२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.