व्ही. पी. कॉलेजचे 
‘पदविका’मध्ये यश

व्ही. पी. कॉलेजचे ‘पदविका’मध्ये यश

Published on

व्ही. पी. कॉलेजचे
‘पदविका’मध्ये यश
ओटवणे ः माडखोल-सावंतवाडी येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसीचा डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल ९०.९० टक्के लागला. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली. यात प्रथम संध्या कांबळे (८४.१८), द्वितीय साक्षी गवस (८२.२७), तृतीय निकिता धुरी (८२.१८) यांनी यश मिळवले. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल महाविद्यालयाचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
----------
बांधकाम कामगारांना
दोडामार्गात मार्गदर्शन
दोडामार्ग ः माटणे येथे कामगार नोंदणीचा कार्यक्रम बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. संचालक सदस्य जेनीफर लोबो, सदस्य दीपक जाधव यांच्या प्रयत्नातून हा नोंदणी कार्यक्रम झाला. सरपंच महादेव गवस यांचे यासाठी सहकार्य लाभले. संचालक सदस्य जेनीफर लोबो यांनी कामगारांच्या योजना समजावून सांगितल्या. नोंदणी लवकर करून घ्या, असे आवाहन केले. सदस्य दीपक जाधव यांनी मार्गदर्शन केले. बहुसंख्य कामगारांनी नोंदणी केली. तालुक्यातील बांधकाम कामगारांनी नोंदणी साटेली-भेडशी येथील संपर्क कार्यालयात करून घ्यावी, असे आवाहन लोबो यांनी केले.
------
दाखल्यांसाठी महिलांची
‘तहसील’मध्ये गर्दी
कणकवली ः ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी उत्पन्नाचा दाखला घेण्याची अट आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख १ ते १५ जुलै असल्याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. तालुक्यात सोमवारी उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी सुमारे दोन हजारांहून अधिक फॉर्म घेण्यात आले. त्यामुळे पुढील १५ दिवस जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
---------
सफाई कर्मचाऱ्यांना
कुडाळात आज प्रशिक्षण
कुडाळ ः स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत येथील नगपंचायतीमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे उद्या (ता. ३) सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याने शहरातील सर्व घंटागाड्या दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच दुपारी १२ नंतर सर्व घंटागाड्या सुरू करण्यात येतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.