कणकवलीत रविवारी
गुणगौरव सोहळा

कणकवलीत रविवारी गुणगौरव सोहळा

Published on

कणकवलीत रविवारी
गुणगौरव सोहळा
कणकवली ः मराठा समाज प्राथमिक शिक्षकांतर्फे दरवर्षी कणकवली तालुका मर्यादित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम रविवारी (ता.७) सकाळी ९.३० वाजता येथील मराठा मंडळ सभागृह येथे आयोजित केला आहे. यात दहावी ७५, बारावी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. पाचवी, आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, नवोदय विद्यालय निवड विद्यार्थी यांचाही गुणगौरव होणार आहे. गुणपत्रकाची छायांकित प्रत (झेरॉक्स) आणणे अनिवार्य आहे. मान्यवर प्राथमिक शिक्षक उपस्थित राहणार आहेत. जुलै २०२३ ते जून २०२४ या वर्षात सेवानिवृत्त झालेले आणि २०२३-२४ मध्ये विविध आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. निकषात बसणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहवे. अधिक माहितीसाठी हेमंत राणे, सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
------------------
शिरोडा बाजारपेठेत
छत्र्यांचे वाटप
वेंगुर्ले ः भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून शिरोडा बाजारपेठेतील भाजी, फळे, फुले विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर राणे, माजी सरपंच मनोज उगवेकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, भाजप तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, रेडी सरपंच रामसिंग राणे, रेडी शक्तीकेंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, बुथ अध्यक्ष एकनाथ साळगावकर, अर्चना नाईक, ज्ञानेश्वर केरकर, ओंकार कोनाळकर, रूपेश बांदेकर, महेश कोनाळकर, समीर कांबळी, मनोहर होडावडेकर, अनिल गावडे, बाळू वस्त आदी उपस्थित होते.
---
कसवण-गावकरवाडीत
छत्र्यांसह वह्यांचे वाटप
कणकवली ः कसवण-गावकरवाडी येथील गणेशकृपा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे कसवण शाळा क्रमांक २ मधील ४४ विद्यार्थ्यांना छत्री व वह्यांचे वाटप करण्यात आले. उद्योजक विष्णू सातवसे, महेश वाळके, गजानन पाटील व गणेश मूर्तिकार विलास गोलतकर यांचे सहकार्य लाभले. मंडळाचे अध्यक्ष विलास गावकर, संतोष गावकर, विजय गावकर, समीर गावकर, श्यामसुंदर मालंडकर, मुख्याध्यापक गोसावी, ताह्माणेकर, हिर्लेकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.