कासार्डे येथे वृक्षारोपण

कासार्डे येथे वृक्षारोपण
Published on

कासार्डे येथे वृक्षारोपण
तळेरे : जिल्हा बॅंकेच्या ४१व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या कासार्डे (ता. कणकवली) येथील शाखेमध्ये काल (ता. १) येथील निसर्ग मित्र परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त बॅंकेच्या प्रवेशद्वाराजवळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्ग मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करण्याची संकल्पना बॅंकेचे शाखाधिकारी सागर साटम आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर मांडली होती. मैत्री परिवारातील सदस्य आणि जिल्हा बॅंकेच्या कणकवली शाखेतील कर्मचारी सौ. शेजल उर्फ वैशाली सावंत यांचाही वाढदिवस असल्याने वाढदिवसाची आठवणीतील भेट म्हणून सोनचाफ्याचे कलम भेट देण्यात आले. या दोन्ही कलमांचे निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष व पत्रकार संजय खानविलकर आणि बॅंकेचे शाखाधिकारी साटम यांच्या हस्ते बॅंकेच्या प्रवेशद्वरावरती वृक्षारोपण केले. याप्रसंगी निसर्ग मित्र परिवाराचे उपाध्यक्ष व पत्रकार दत्तात्रय मारकड, खजिनदार निकेत पावसकर, सदस्य व प्राथमिक शिक्षक झाकीर शेख, कासार्डे विद्यालयाचे प्रा. विनायक पाताडे, पत्रकार महेश तेली, बॅंकेचे कर्मचारी वंदना राणे, प्रशांत परब, अर्पणा गुरव, शरद बागवे, आदी उपस्थित होते.
94290

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com