चिपळुणातील गोविंदगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा

चिपळुणातील गोविंदगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा

Published on

94301

गोविंदगडावर सापडले ८० तोफगोळे
चिपळूण, ता. २ः शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी आलेल्या तरुणांना ८० पेक्षा जास्त तोफांचे गोळे आढळून आले आहेत. या गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चिपळूण येथील शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गोविंदगडावर फिरण्यासाठी गेले होते. फेरफटका मारताना सुरवातीला त्यांना तोफेचे २ गोळे दिसले. तेथील माती बाजूला केली असता त्यांना अजून काही तोफांचे गोळे आढळले. त्यांनी लगेचच राजे सामाजिक प्रतिष्ठानचे गोवळकोट येथील अध्यक्ष विशाल राऊत यांना संपर्क केला. ते तत्काळ गडावर दाखल झाले आणि त्यांनी उपस्थित मुलांना योग्य त्या सूचना देऊन एक-एक गोळा बाहेर काढण्यास सुरवात केली. बघता बघता मुलांना सुमारे ८० पेक्षा जास्त गोळे बाहेर काढण्यात यश आले. ते दगडी तोफगोळे आहेत. राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्षे संवर्धनाचे काम सुरू असून या आधी चार ते पाच गोळे मिळाले होते. गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा पाहता गडावर गोळे मिळतील, असा त्यांचा अंदाज होता. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत, सौरभ टाकळे, गणेश बुरटे, प्रथमेश शिंदे, सोहम हरवडे, आशुतोष राऊत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.