साडवली - कुडवलीतील साकव मोजतोय अखेरची घटका

साडवली - कुडवलीतील साकव मोजतोय अखेरची घटका

Published on

94201

कुडवलीतील साकव मोजतोय अखेरची घटका
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २ ः संगमेश्वर तालुक्यातील कुडवली बौद्धवाडी येथील लोखंडी साकव मोडकळीस आला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात साकव वाहून जाण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कुडवली बौद्धवाडी येथील सप्तलिंगी नदीवरील लोखंडी साकव पुढे साडवली एमआयडीसी व कोसुंब या दोन ठिकाणी जोडतो. सध्या हा साकव अत्यंत धोकादायक बनला आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या मार्गांवरून प्रवास करणे थांबवले आहे. सध्या येथील विद्यार्थी कुडवली ते देवरूख व त्यानंतर देवरूख ते कोसुंब असा दूरचा एसटी प्रवास करून कोसुंब हायस्कूलला जात आहेत. दुसरा जवळचा मार्गच नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना हा पर्याय निवडावा लागत आहे. या साकवाची विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी असणारी गरज ओळखून संबंधित यंत्रणेसह लोकप्रतिनिधिंनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.