‘जीवन प्रबोधिनी’तर्फे गुणवंतांचा सत्कार

‘जीवन प्रबोधिनी’तर्फे गुणवंतांचा सत्कार
Published on

‘जीवन प्रबोधिनी’तर्फे गुणवंतांचा सत्कार
तळेरे ः जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक सत्यवान नर यांनी कुणकवण (ता. देवगड) गावातील दहावी व बारावी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व शैक्षणिक भेट वस्तू देऊन कौतुक केले. मुलांना प्रोत्साहन मिळावे आणि भविष्यात मोठी झेप घेता यावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले, ‘‘कुणकवण गावाने विनोद तावडेंसारखा मोठा नेता महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला दिला. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री पद भूषविलेला नेता आपल्या कुणकवण गावातील आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ट्रस्ट स्थापन झालेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठ्या पदावर पोहोचावं आणि आपल्या कुणकवण गावचे नावं महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर कोरावे.’’ यावेळी कुणकवणचे उपसरपंच मंगेश गुरव, माजी उपसरपंच श्रीराम ठाकूर-देसाई, संयोजक हरेश जनक, बाळा राणे, संस्थेचे पदाधिकारी मेघनाथ शेट्टी, उदय कदम, राजन पाटणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशव मेस्त्री, दिगंबर मोरे आदी उपस्थित होते.
94307

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com