

94233
महाविद्यालयात कौशल्याधारित अभ्यासक्रम
प्रा. बीना कळंबटे ; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : गतवर्षी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करत असताना संमोहनाची मूलभूत कौशल्ये या कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश केला. असा अभ्यासक्रम सुरू करणारे गोगटे- जोगळेकर महाविद्यालय हे बहुदा राज्यातील पहिले महाविद्यालय असावे, असे प्रतिपादन मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बीना कळंबटे यांनी केले.
नियतवयोमानानुसार प्रा. कळंबटे सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्त आयोजित सदिच्छा समारंभात त्या बोलत होत्या. प्रा. कळंबटे या जुलै १९९२ मध्ये मानसशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून रूजू झाल्या. ३२ वर्षांच्या सेवेत त्यांनी महाविद्यालयाने सोपवलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडल्या. महाविद्यालयात अध्यापन करत असतानाच त्यांनी विविध शासकीय समित्यांमध्ये अध्यक्ष, सदस्या, समुपदेशक म्हणून कार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते प्रा. कळंबटे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. साखळकर यांनी प्रा. कळंबटे यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या स्वभावातील विशेष गुणांचा उल्लेख केला. कार्यक्रमाला डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, संजीव दांडेकर, मनोज सरदेसाई, नंदकुमार गोळपकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नीलेश पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.