परुळेबाजार ग्रामपंचायतीचा कृषीमंत्र्याच्या हस्ते सन्मान

परुळेबाजार ग्रामपंचायतीचा
कृषीमंत्र्याच्या हस्ते सन्मान
Published on

परुळेबाजार ग्रामपंचायतीचा
कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २ ः परुळेबाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक शेती केंद्रित ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काल (ता.१) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिनानिमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू प्रशांत कुमार गुलाबाराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री शिंदे व कृषिमंत्री मुंडे यांच्या हस्ते परुळे बाजार ग्रामपंचायतीला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रामसेवक शरद शिंदे, उपसरपंच राजू दुधवडकर, माजी सभापती नीलेश सामंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रसाद पाटकर उपस्थित होते. प्रतिष्ठानमार्फत विविध स्तरावर कृषी व ग्रामपातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा ग्राम स्तरांवरील बहुमान ग्रामपंचायत परुळेबाजारला प्रदान करण्यात आला.
94330

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.