देवगड, मालवणातील वाचनालयांना पुस्तके

देवगड, मालवणातील वाचनालयांना पुस्तके

Published on

देवगड, मालवणातील वाचनालयांना पुस्तके

आचरा वाचनमंदिरची मदत; वाचकांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्याचा हेतू

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २ ः आपल्याकडे असलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा इतर वाचनालयांना देऊन वाचकांच्या ज्ञान कक्षा रुंदाव्यात, या उदात्त हेतूने रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरातर्फे मालवण व देवगड तालुक्यांतील सात वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट योजना राबविण्यात आली. याचा प्रारंभ सरस्वती वाचनालय चिंदर येथून करण्यात आला.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर ग्रंथालय भेट आणि पुस्तक भेट उपक्रमांतर्गत सुमारे १३५ पुस्तके भेट देण्यात आली. चिंदर येथे झालेल्या कार्यक्रमात देवी सरस्वती वाचनालय उपाध्यक्ष संतोष पाताडे, कार्यवाह हेमांगी खोत, कार्यकारिणी सदस्य हिमाली अमरे, गोपाळ चिंदरकर, प्रकाश खोत, विवेक परब, ग्रंथपाल स्वरा पालकर, भूषण दत्तदास यांसह रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश परुळेकर, विरेंद्र पुजारे, भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी, कर्मचारी महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात मालवण तालुक्यातील चिंदर, त्रिंबक, बांदिवडे, माळगांव, कट्टा येथील वाचनालयांना, दुसऱ्या टप्प्यात आचरा काझीवाडा, हिंदळे येथील वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट देण्यात येणार आहेत. रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या या उपक्रमाचा त्रिंबक गाडगीळ गुरुजी वाचनालय अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, कार्यवाह प्रशांत मेहंदळे, माळगांव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालयाचे अरुण भोगले, गुरुनाथ ताम्हणकर, शंकर चव्हाण, बॅ. नाथ पै वाचन मंदिराचे अध्यक्ष बापू तळवडेकर, ग्रंथपाल सुजाता पावस्कर आदी उपस्थित होते.
94338

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.