

...अन्यथा आमच्या स्टाईलने कारभार सुधारू
एसटी कामगार संघटना ः कुडाळ आगाराला इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः येथील एसटी आगारामध्ये दिवसाढवळ्या अनागोंदी कारभार सुरू असून यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. १० जुलैपर्यंत कारभार सुधारा; अन्यथा आमच्या स्टाईलने सुधारणा करू, असा इशारा शिवसेना एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आणि शिवसेनेचे अतुल बंगे यांनी आज दिला.
येथील एसटी आगाराचा कारभार सुधारावा, प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी आमदार वैभव नाईक यांनी अनेक वेळा प्रयत्न केले; मात्र यात काहीच सुधारणा झाली नसल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेनेचे नेते बंगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ तालुका शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, अष्पाक कुडाळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुशील चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ शिवसेना शहर उपशहरप्रमुख गुरू गडकर, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, शैलैश काळप, संदीप महाडेश्वर, अमित राणे व नवीन बसस्थानकात असणारे रिक्षाचालक उपस्थित होते.
94341
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.