गोव्याहून नेपाळला जाणाऱ्या लक्झरीला वाफोलीत अपघात

गोव्याहून नेपाळला जाणाऱ्या
लक्झरीला वाफोलीत अपघात
Published on

गोव्याहून नेपाळला जाणाऱ्या
बसला वाफोली येथे अपघात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ : बांदा-दाणोली मार्गावर वाफोली येथे ‘त्या’ धोकादायक वळणावर काल (ता. १) रात्री उशिरा खासगी प्रवासी बसला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘त्या’ धोकादायक वळणावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.
बस पर्यटकांना घेऊन गोव्याहून नेपाळला जात असताना वाफोली येथे बसचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडला. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व क्रेनच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत बस रस्त्याकडेला सुस्थितीत काढण्यात आली. आतापर्यंत वीस ते पंचवीस दिवसांत तेरा ते चौदा वाहनांचा याठिकाणी अपघात झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते गुरू कल्याणकर, हेमंत दाभोलकर व गुरुदास गवंडे यांच्या पुढाकारातून धोकादायक वळणावर दिशादर्शक फलकही लावण्यात आले; परंतु पर्यटकांना या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने व काहीवेळा वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळे अपघात घडतात. याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक वाहनधारक करीत आहे. भविष्यात असे अपघात घडून कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार असेल. अन्यथा, याबाबत त्वरित कार्यवाही करा, अशी मागणी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील वाहनधारकांकडून होत आहे.
94348

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com