दाखल्यांसाठी विकेंद्रीत शिबिरांचे आयोजन करा ः देवेंदर सिंह

दाखल्यांसाठी विकेंद्रीत शिबिरांचे आयोजन करा ः देवेंदर सिंह

दाखल्यांसाठी विकेंद्रीत शिबिरांचे
आयोजन कराः देवेंदर सिंह
रत्नागिरी, ता. ३ : ''मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण'' योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज भरण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने प्रत्येक तहसीलदाराने शिबिरांचे आयोजन करून पारदर्शक कामकाज करावे. एकाच केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षताही घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी.
प्रमुख ठिकाणी फलक उभे करावेत. या योजनेचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याने लाभार्थ्याचा अर्ज भरताना सर्व माहिती भरल्याची खात्री करावी. उत्पन्नाचे दाखले, अन्य कागदपत्रे देण्यासाठी आणि एकूणच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत पारदर्शीपणे कामकाज करावे. त्यासाठी प्रत्येक तहसीलदाराने नियंत्रक अधिकारी म्हणून काम करावे. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी या योजनेच्या शासननिर्णयाबाबत संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com