सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणात स्वच्छता

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणात स्वच्छता

Published on

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणात स्वच्छता

भाजपचा पुढाकार ः गटारांसह झाडींची साफसफाई


सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत यांच्या प्रयत्नाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड याच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणमधील गटार सफाई व रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू केले आहे.
सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्गनगरी नवनगर रहिवाशी संघाने नुकतीच भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्गनगरी प्राधिकारण समिती सदस्यांची भेट घेतली व नवनगरमधील अंतर्गत रस्ते, नगरपंचायत करणे, विरंगुळा केंद्रे, गटार बांधणी करणे असे अनेक प्रश्न मांडले. याचवेळी सद्यस्थितीत प्राधिकरणमधील रस्त्यालगतची गटारे बुजलेली असल्याने रस्त्यावरच पाणी साचून राहते, रस्ता दुतर्फा झाडी वाढल्याने वाहनचालकांना वळणावर दिसत नाही, अपघाताची शक्यता असल्याने ही कामे तातडीने करण्याची मागणी केली. श्री. सावंत यांनी प्राधिकरणमधील समस्याची तात्काळ दखल घेत गटार सफाई व झाडी तोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी स्वखर्चाने जेसीबीही उपलब्ध करून दिला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनीही जेसीबी व कामगार पुरवत गटार साफसफाई व झाडी तोडण्याचे काम सुरू केले. सिंधुदुर्गनगरीचे अन्य प्रश्नही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सोडवू, असे आश्वासन सावंत यांनी दिले. प्राधिकरणमधील स्वच्छतेचे काम हाती घेतल्याबद्दल सिंधुदुर्गनगरी नवनगर रहिवाशी संघाच्यावतीने संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांनी समाधान व्यक्त केले.
94381

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.